ग्रामीण घडामोडी

स्टेट बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त संगणक वाटप

ग्रामस्थांच्या वतीने संगणक मिळविण्यासाठी सहकार्य केलेले पंडित पाटील, शाखाधिकारी केदार चौगुले यांचा सत्कार करण्यात आला

स्टेट बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त संगणक वाटप
। अक्कलकोट, दि.26 :
स्टेट बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेच्या वर्धापनदिन बँकेच्या वतीने 5 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना संगणक संच वाटप करण्यात आल्याची माहिती बँकेचे शाखाधिकारी केदार चौगुले यांनी दिली.
स्टेट बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दर वर्षी विविध उपक्रम राबविले जातात. यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे या हेतूने अक्कलाकेट तालुक्यातील पाच जि.प. शाळेना संगणकीय संच भेट देण्यात आले. यामध्ये तोरणी, कडबगांव, दुधनी, नागनहळ्ळी, स्वामी समर्थ मुकबधिर शाळा अक्कलकोट असे गरजूवंत शाळांना देण्यात आली.
सदरील उपक्रम राबविताना प्रत्येक्षात शाळेला भेट देऊन गरज असणार्‍या पाच शाळा निवडण्यात आल्या, आणि त्यांना वाटप करण्यात आले. या संगणकांचे माहिती तळागाळातील दिनदलितांच्या व गोरगरीबांच्या मुलांना व्हावा या उदात्त हेतूनेच यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त संगणक देण्याचे निश्चय करून संगणक देण्यात आले.
तोरणी (ता. अक्कलकोट) हे कर्नाटक -महाराष्ट्र सिमावर्ती भागात वसलेला गाव असून या गावातील जि.प. शाळेला बँकेच्या वतीने संगणकीय संच वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक झुंजा, गावातील प्रतिष्ठित कल्लप्पा पाटील, सुभाष बिराजदार, माणिक बिराजदार, अलगोणे तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने संगणक मिळविण्यासाठी सहकार्य केलेले पंडित पाटील, शाखाधिकारी केदार चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button