सामाजिक बांधिलकी

दातृत्व असणारा दाता मिळणे दुर्लभ : शिवपुत्र स्वामीजी रक्षाबंधननिमित्त 250 विद्यार्थिनींना मिळाला नवीन ड्रेस

केंगनाळकर प्रशालेतील 250 विद्यार्थिनींना नवीन ड्रेस वितरणप्रसंगी शिवपुत्र स्वामीजी, वैशाली सुरवसे, शरणराज केंगनाळकर, कविता केंगनाळकर, राजशेखर बुरकुले, सोमेश्वर याबाजी, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, विद्यानंद स्वामी, सोमनाथ चौधरी

दातृत्व असणारा दाता मिळणे दुर्लभ : शिवपुत्र स्वामीजी रक्षाबंधननिमित्त 250 विद्यार्थिनींना मिळाला नवीन ड्रेस

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर : शतेशू जायते शुर म्हणजे शंभर जणात एक जण शूर असतो. सहस्त्रेशू पंडित म्हणजे हजार जणांत एक ज्ञानी असतो. वक्ता दशसहस्त्रेशू म्हणजे 10 हजार जणांत एक वक्ता असतो. दाता भवती वा नवा म्हणजे इतक्या जणात दाता असतोच असे नाही. म्हणजे दातृत्व असणारा दाता मिळणे दुर्लभ आहे. मात्र सुदैवाने समाजसेवक दत्ताअण्णा सुरवसे हे दाता आपल्या जवळ आहेत असे प्रतिपादन श्री बसवारूढ मठाचे शिवपुत्र स्वामीजी यांनी केले.
उद्योगपती व समाजसेवक दत्ताअण्णा सुरवसे यांच्या दातृत्वातून आणि वीरशैव व्हिजन च्या माध्यमातून रक्षाबंधन निमित्त केंगनाळकर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील 250 विद्यार्थिनींना नवीन ड्रेस वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर उद्योजिका वैशाली सुरवसे, केंगनाळकर प्रशालेचे अध्यक्ष शरणराज केंगनाळकर, सचिवा कविता केंगनाळकर, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. प्रारंभी राजशेखर बुरकुले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 250 विद्यार्थिनींना ड्रेसचे वाटप करण्यात आले.
शिवपुत्र स्वामीजी पुढे बोलताना म्हणाले की, दातव्यं भोकतव्यं सती म्हणजे दान केले पाहिजे आणि घेणाऱ्याने घेतले पाहिजे. विभवे संचयौ न कर्त्यव्यं म्हणजे संपत्तीचे संचय करू नये. पश्चेह मधुकरीणा संचितम अर्थ हरनत्यन्ये म्हणजे मधमाशी पोळ्यामध्ये मधाचे संचय करते. पण ते मध दुसराच खात असतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी तर आभारप्रदर्शन केंगनाळकर प्रशालेचे प्राचार्य विद्यानंद स्वामी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ चौधरी, चेतन लिगाडे, मेहुल भुरे यांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळी : केंगनाळकर प्रशालेतील 250 विद्यार्थिनींना नवीन ड्रेस वितरणप्रसंगी शिवपुत्र स्वामीजी, वैशाली सुरवसे, शरणराज केंगनाळकर, कविता केंगनाळकर, राजशेखर बुरकुले, सोमेश्वर याबाजी, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, विद्यानंद स्वामी, सोमनाथ चौधरी

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button