*दहिटणे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेगांवकर यांची बिनविरोध निवड………..*
*दहिटणे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेगांवकर यांची बिनविरोध निवड...........*

*दहिटणे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेगांवकर यांची बिनविरोध निवड………..*

अककलकोट दि 04 प्रतिनिधी दहिटणे ता.अक्कलकोट – दहिटणे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेगांवकर व उपाध्यक्षपदी महम्मद ताहीर शेख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.दहिटणे येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा मारुती मंदिर सभामंडप येथे पोलीस पाटील भिमाशंकर म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.प्रारंभी ग्रामसभेचे सचिव ग्रामविकास अधिकारी पी.एल.पवार यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून सभेपुढील विषय वाचले.यावेळी ग्रामस्थांनी विविध विषयाच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला.या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेगांवकर व उपाध्यक्षपदी महम्मद ताहीर शेख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी प्रशासक पी.एल.कोळी साहेब, थोरात साहेब, ग्रामविकास अधिकारी पी.एल.पवार साहेब, माजी सरपंच दौलत मोरे, चन्नवीर बोधले,रविंद्र रसनभैरे, माजी उपसरपंच दिगंबर राजेगावकर एकनाथ शिंदे,अरुण पोपसभट गुरुजी बाळ पाटील, तेजस माने,महेश माने,बाबासाहेब पाटील,नारायण पाटील,भरत राजेगावकर, दिलीप व्हट्टे, पंडीत चौधरी,विलास भस्मे, हर्षवर्धन सोनकांबळे,बाळू शहाणे, शार्दूल रसनभैरे, शेकुंबर मुजावर,शिलार नदाफ, गोविंद मोरे,अजिज नदाफ,लाला साळूंखे,श्रीशैल कुंभार, सोमण्णा माळी, अण्णासाहेब गायकवाड,अप्पाराव चौधरी,देवराज बंदीछोडे,आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक, महिला बचत गट पदाधिकारी, गावातील महिला ग्रामस्थ व तरुण बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी आभार ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रमेश स्वामी सर यांनी मानले.
