अखेर अक्कलकोट बस स्थानकाच्या कामला सुरुवात: आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून साकारतोय अत्याधुनिक बस स्थानक..
पाडकामाची पूर्वतयारीच्या अनुषंगाने करावयाची कामे यास सुरुवात झाल्याने तालुकावासियांतून समाधान व्यक्त होत आहे.
अखेर अक्कलकोट बस स्थानकाच्या कामला सुरुवात: आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून साकारतोय अत्याधुनिक बस स्थानक..
अक्कलकोट, दि.9 : राज्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेल्या शहरातील बसस्थानके ही बसपोर्ट झाली. मात्र गेल्या पाच दशकापूर्वी बांधण्यात आलेले अक्लकोटचे बसस्थानक संपूर्णत: मोडकळीस आल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून नुकतेच रु.29 कोटीचा निधी मंजूर झाला. त्यानंतर निविदाही मंजूर झाली. पाडकामाची पूर्वतयारीच्या अनुषंगाने करावयाची कामे यास सुरुवात झाल्याने तालुकावासियांतून समाधान व्यक्त होत आहे.
राज्यातील टॉप फाईव्ह मधील तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र अक्कलकोटचे नाव राज्यासह, परराज्य, परदेशात असताना मात्र श्री स्वामी समर्थांची नगरी विकासापासून नेहमीच कोसोदूर राहिली. मात्र आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामाच्या माध्यमातून कायापालट येत्या काही दिवसात पहायला मिळणार आहे. त्या पध्दतीने विकासाची वाटचाल सुरु आहे.
अक्कलकोटच्या बसस्थानकाचा विषयक अनेकवेळा गाजला. बसस्थानकाच्या दुरुस्ती शिवाय आजतागायत कोणतीच सुधारणा त्या ठिकाणी झालेली नव्हती. याचे कारण बसस्थानकाच्या जागेची तांत्रिक अडचणी ह्या काही महसूल अधिकारी व कर्मचारी उपअधिक्षक भूमीअभिलेख यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा विषय देखील बसस्थानक सुधारणा होण्याकरिता कळीचा मुद्दा ठरला होता. मात्र यावर देखील मात करुन अखेर नव्याने बसस्थानक होण्याकामी रितसर पध्दतीने सर्व ती शासकीय कागदोपत्रांची जुळवाजुळव करण्यास यश आले अन् आता प्रत्यक्षात काम सुरु करण्याकामीची पूर्वतयारी सुरु करण्यात आलेली आहे. याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.