दिवाणी व फौजदारी न्यायालय अक्कलकोट येथे राष्ट्रीय लोक अदालत पार पडली
लोक अदालतमध्ये 616 प्रकरणे तडजोडीअंती निकाली झाल्याची माहिती अक्कलकोट तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर बाळासाहेब गायकवाड यांनी दिली.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230909-WA0051-780x470.jpg)
अक्कलकोट, दि.9 : दिवाणी व फौजदारी न्यायालय अक्कलकोट येथे राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. सदर लोक अदालतमध्ये 616 प्रकरणे तडजोडीअंती निकाली झाल्याची माहिती अक्कलकोट तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर बाळासाहेब गायकवाड यांनी दिली.
लोक अदालतमध्ये प्रलंबित व दाखल पूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी न्या. बाळासाहेब गायकवाड, न्या.रसूल शेख यांनी पॅनेलप्रमुख म्हणून काम पाहिले. लोक अदालतमध्ये 121 प्रलंबित आणि 495 दाखलपूर्व अशी एकूण 616 प्रकरणे लोक अदालतमध्ये निकाली काढण्यात आली. निकाली काढण्यात आलेल्या 616 प्रकरणांमध्ये एकूण 94 लाख 87 हजार 252 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली.
यावेळी विधीज्ञ व्ही.बी.पाटील व ए.एस.पाटील यांनी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले. यावेळी अक्कलकोट तालुका विधीज्ञ संघाचे अध्यक्ष हल्ले, सचिव सविता बाके, तालुका विधीज्ञ संघाचे सदस्य, सरकारी वकील सरवदे, बेसकर, न्यायालयातील सहाय्यक अधिक्षीका पठाण, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी हजर होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)