ग्रामीण घडामोडी

अक्कलकोट नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्याची मोहिम जोमाने सुरु केलेली आहे. ती अशीच पुढे काही दिवस चालणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या सूत्रांनी दिली

अतिक्रमण हटलेच पाहिजे’ याकरिता सर्वच पक्षांनी एकत्र येवून पाठिंबा देणे गरजेचे आहे

अक्कलकोट, दि.9 : कोणत्याही शहरविकासाला अतिक्रमण बाधित ठरते. त्यामुळे विकास खुंटला जातो. अशी अनेक उदाहरणांची शहरे आहेत. यामध्ये अक्कलकोट देखील मागे राहिलेला नाही. नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्याची मोहिम जोमाने सुरु केलेली आहे. ती अशीच पुढे काही दिवस चालणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या सूत्रांनी दिली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    


श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी वाढत चाललेली गर्दी, मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांची रोजची रेलचेल पाहता अनेकवेळा येणार्‍यांनी थेट विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर यांना श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या अतिक्रमणामुळे होणारा तरंगती व स्थानिक लोकसंख्येला त्रास याबाबत वारंवार थेट संवाद करण्यात येत असल्याचे परिणाम आज नगरपरिषदेच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहिमचे चित्र दिसत आहे.
‘अतिक्रमण हटलेच पाहिजे’ याकरिता सर्वच पक्षांनी एकत्र येवून पाठिंबा देणे गरजेचे आहे. गेल्या दोन दिवसापासून अतिक्रमण हटाव मोहिम नगरपरिषदेने सुरु केलेली आहे. अनेक भाविक तुळजापूर मार्गे अक्कलकोट, सोलापूरमार्गे व गाणगापूरकडे जाणारा हमरस्ता पाहिला तर अतिक्रमणाचा विळखा पहायला मिळतो. या बरोबरच अतिक्रमणे करुन उघड्यावर मांस विक्री, दुर्गंधी यामुळे भक्तांबरोबर स्थानिक देखील वैतागले आहेत. यासाठी कांदा बाजार, स्टेशन रोड परिसरासह शहरातील मुख्य रस्ता, विजय कामगार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक, पंचायत समिती, माणिक पेठ, श्री वटवृक्ष, समाधी मठ व अन्नछत्र मंडळ परिसरातील अतिक्रमणे काढुन स्वामीभक्तांना मार्ग मोकळा करुन देण्याची मागणी पुढे येत आहे.
नगरपरिषदेने यापुढील काळात अतिक्रमण हटाव या पथकाची नेमणूक करुन वेळोवेळी सदरचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी सतर्कतेने काम करण्याची गरज आहे. श्री वटवृक्ष मंदिर परिसरातील गेल्या अनेक वर्षापासूनची धर्मशाळा त्याठिकाणी दुचाकी व तीनचाकी पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी पुढे येत आहे. सर्वात महत्त्वाचे अन्नछत्र मंडळ ते श्री वटवृक्ष मंदिर हा अरुंद रस्ता मोकळा करुन भविष्यातील अनर्थ टाळता येईल अशा पध्दतीने सदरचा मार्ग विकसित व्हावा अशी मागणी पुढे येत आहे. याकडे देखील नगरपरिषदेच्या प्रशासन प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button