निसर्ग सेवा फौडेशनच्या नावातच सेवा असल्यामुळे हे अव्दीतीय कार्य फौंडेशनच्या माध्यमातून होतं आहे : महेश हिंडोळे माजी नगरसेवक अक्कलकोट
फत्तेसिंह क्रिडांगणाचे स्वच्छता व १८ बाकड्यांचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून नगर सेवक महेश हिंडोळे बोलत होते.

निसर्ग सेवा फौडेशनच्या नावातच सेवा असल्यामुळे हे अव्दीतीय कार्य फौंडेशनच्या माध्यमातून होतं आहे : महेश हिंडोळे माजी नगरसेवक अक्कलकोट


निसर्ग सेवा फौंडेशनच्या बतीने फत्तेसिंह क्रिडांगणाचे स्वच्छता व १८ बाकड्यांचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून नगर सेवक महेश हिंडोळे बोलत होते.

अक्कलकोट : – (तालुका प्रतिनिधी) निसर्ग सेवा, फौडेशनच्या नावातच सेवा असल्यामुळे हे अव्दीतीय कार्य आहे. म्हणून स्वयंस्पतीने सेवा भाची माणसे जोडले जात असल्याचे गौरव उद्गार नगर सेवक महेश हिंडोळे यांनी काढले.

ते निसर्ग सेवा फौंडेशनच्या बतीने फत्तेसिंह क्रिडांगणाचे स्वच्छता व १८ बाकड्यांचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून नगर सेवक महेश हिंडोळे बोलत होते.
या वेळी प्रसिद्ध विधीज्ञ अँड शरद फुटाणे फांडेशनचे संस्थापक सुनिल बिराजदार प्रसिद्ध उद्योगपती विलास कोरे राजकुमार हिप्परगी, गुरुमामुली मल्लम्मा पसारे वैशाली लोकापूरे सुनिता हडलगी विद्यादर गुरव प्रमोद लोकापूरे सचिन किरनळ्ळी नीलकंठ कापसे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महेश हिंडोळे म्हणाले. निसर्ग सेवा फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल बिराजदार यांनी स्वच्छ अक्कलकोट सुंदर अक्कलकोटचे – संकल्प गेल्या दोन वर्षा पूर्वी सोडली आणि स्वच्छ शहराचे आवड असणारे 10 सेवा भावीना सोबत घेऊन तन मन धनाने चांगल्या कामाला सुरुवात केली. ते इवलस रोपट आज वटवृक्षात रूपांतर होत आहे. हे अक्कलकोट करासाठी अभिमानास्पद आहे. त्यानी स्वच्छतेच्या कामाची सुरुवात केली परंतू आज स्वच्छतेबरोबरच न थाबता मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पीण्यासाठी शहरात विविध ठिकाणी पाण्याचा हौद वृक्षा रोपण स्मशानभुमी सुशोभिकरण वृक्षरोपण व संगोपन आदी कार्य करीत आहे या निस्वार्थ सेवा भावी संस्थेच्या पाठीशी दानशुरांनी राहावे असे आवाहन महेश हिंडोळे यांनी केले या प्रसंगी फत्तेसिंह क्रिडांगणावरील कडू गवत झाडी झुडपे काडून स्वच्छ केले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १८ बाकड्यांचे लोकार्पण करण्यात आला. या बाकड्याचे किडांगणावर फिरायला येणाऱ्या अबाल वृद्ध नागरीक महिलांना बसण्यासाठी सोयीचे होणार आहे. या आधी श्री स्वामी समर्थ’अन्नछत्र मंडळाने ही या ठीकाणी 30 बाकडे बसवले होते, त्यात आणखीन भर म्हणुन निसर्ग सेवा फौंडेशनने 18 बाकडे ठेऊन मोलाचे कामगिरी केलेले आहे .

चौकट: या सामाजीक कार्यात आपले खारीचे वाटा राहावा या हेतूने उद्योगपती विलास कोरे यांनी निसर्ग सेवा फाउंडेशन ला ११ हजार रुपये देणगी देऊन सुप्रभात मॉर्निंग गृपच्या वतीने सुनिल बिराजदार यांचे सत्कार करण्यात आले.
चौकट: – निसर्ग फौंडेशनने विरक्त मठ स्मशान भुमीत सुशोभिकरण १८ बाकडे बसवणे अक्कलकोट शहरात विविध ठीकाणी वृक्ष रोपण व संगोपन मल्लिकार्जुन मंदार परिसर, बसस्थानक परिसर बायपास रोड, वागदरी रोड आदी मार्गावर स्वच्छता व काटेरी झाडे तोडून ऑक्सीजन निर्मीत वृक्षाचे लागवड केलेला आहे. या पुढे सर्व जाती धर्माचे स्मशान भुमी खुशोभि करण करण्यात येणार असून प्रत्येक ठीकाणी पाण्याची टाकी, हौद बांधून टँकरने पाणी पूवण करण्यात येणार आहे. फौंडेशनने या कामी नविन पाण्याचा टँकर होऊन शहर परिसरातील दोन किलो मीटर अंतरा पर्यंत रस्त्याच्या कडेला वृक्षलागवड ‘करून संगोपन करणार.
सुनिल बिराजदार निसर्ग फौंडेशनचे संस्थापक
यावेळी विश्वनाथ देवरमनी, शंकर आलोणे तात्या समाणे सोमेश्वर पाटील, श्रीकांत आलंदी, आनंद विभुते अनिल बिडवे, सिद्धाराम मोगे, बजे सर सुरेश पाटील सुरेश हिरापूर राजकुमार एकबोटे, प्रफुल्ल ईचगे महेश लंगोटे, रघुनाथ कापसे, शिवाजी चौगुले अंबण्णा पवार, चिदानंद बाबा शिवानंद कार्ले शरणु मुदगोंडा, विशाल पसारे महेश पाटील रेवणप्पा पाटील शिवानंद पत्तरगी रामलिंग शेरीकर श्रवण भास्कर जयसिंग यादव आदी फाउंडेशनचे सदस्य होते .