स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे आर्थिक वर्षाच्या अधि मंडळाची वार्षीक सर्वसाधरण सभा संपन्न
स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 या आर्थिक वर्षाची 27 वी अधि मंडळाची वार्षीक सर्वसाधरण सभा

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे आर्थिक वर्षाच्या अधि मंडळाची वार्षीक सर्वसाधरण सभा संपन्न
। अक्कलकोट,दि. 29
तालुक्यातील दहिटणे येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 या आर्थिक वर्षाची 27 वी अधि मंडळाची वार्षीक सर्वसाधरण सभा शुक्रवारी दुपारी कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आमदार जेष्ठ मार्गदर्शक संचालक सिद्रामप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष संजिवकुमार पाटील हे होते.
दरम्यान श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ सभासद व माजी संचालक शिवयोगी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी दि.13 सप्टेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयास अनुसरून साखर कारखान्याने महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्याकडे प्रस्ताव लवकरच सादर करीत आहोत. आणि कोणत्याही परिस्थितीत कारखान्याचा गाळप सुरू अशी ग्वाही सिद्रामप्पा पाटील यांनी दिली. या वार्षिक सभेमध्ये सन 2020-21-22-23 या अर्थिक वर्षाचे ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मान्यता व कारखान्याच्या वैधानिक लेखापरिक्षक यांनी सादर केलेल्या लेखापरिक्षण अहवाल स्विकारून त्यास मान्यता देण्यात आली. यासह सभेपुढील विविध विषयांना टाळ्यांच्या गजरात उपस्थित सभासदानी अनुमोदन दिले.
सदर सभेस उपाध्यक्ष विश्वनाथ भरमशेट्टी व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, संचालक दिलीपराव पाटील, उत्तमराव वाघमोडे, अप्पासाहेब (अप्पूकाका) पाटील, दिलीपराव शावरी, अभिजित सवळी, मल्लिकार्जून बिराजदार, भरमनाथ घोडके, देवेंद्र बिराजदार, शिवप्पा बसर्गी, माजी संचालिका गिरिजा विजापूरे, माजी संचालक शिवयोगी स्वामी, विवेकानंद उंबरजे, धोंडप्पा यमाजी, राजेंद्र बंदिछोडे, मोतीराम राठोड, शरणू काळे, मल्लिनाथ दुलंगे, सिध्दाराम कलबुर्गी, प्र. कार्यकारी संचालक अशोक मुलगे व उपस्थित सभासद, कार्यक्रमाचे विषय वाचन प्र. कार्यकारी संचालक अशोकराव मुलगे यांनी केले. तर प्रस्ताविक उत्तमराव वाघमोडे व आभार मल्लिनाथ दुलगे यांनी मानले. यावेळी साखर कारखान्याचे संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारीवृंद उपस्थित होते.
