अक्कलकोट,मैंदर्गी,दुधनी सह तालुक्यातील विविध गावांतून बप्पांना भावपूर्ण निरोप…
विविध मंडळाने काढण्यात आलेल्या आरासामध्ये धार्मिक,पौराणिक,ऐतिहासिक, देशभक्तीपर, स्वच्छता अभियान,अन्नदान आदीवर देखावे

अक्कलकोट,मैंदर्गी,दुधनी सह तालुक्यातील विविध गावांतून बप्पांना भावपूर्ण निरोप…


विविध मंडळाने काढण्यात आलेल्या आरासामध्ये धार्मिक,पौराणिक,ऐतिहासिक, देशभक्तीपर, स्वच्छता अभियान,अन्नदान आदीवर देखावे


श्री गणपती बप्पा मोरया…! पुढच्या वर्षी लवकर या…! च्या जयघोषात अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी या शहरासह तालुक्यातील विविध गावांतून बप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. विविध मंडळाने काढण्यात आलेल्या आरासामध्ये धार्मिक,पौराणिक, ऐतिहासिक, देशभक्तीपर, स्वच्छता अभियान, अन्नदान आदीवर देखावे व घोषवाक्य सादर करण्यात आले होते.

सेंट्रल चौक येथे वीरशैव गवळी समाज व कुरणलक्ष्मी देवस्थानच्यावतीने गणेशभक्तांकरिता प्रसाद वाटप करण्यात आले. तर आरस स्पर्धेकरिता शिवसम्राट चौक मंडळाने मंडळाचे आधारस्तंभ नगरसेवक अशपाक बळोरगी, माजी नगरसेवक मल्लिनाथ स्वामी, प्रसिध्द व्यापारी प्रमोद लोकापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने आरास स्पर्धा भरविण्यात आली होती.
पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी चोख बंदोबस्त ठेवले होते.
एकाहून अधिक सरस नवे जुने गाणे ढोल ताशाच्या कडकडाट, लेझिम, ढोलपथक, नयनरम्य विद्युरोषणाई अतिषबाजीने शहर परिसर दमदमून गेला होता.
विविध मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीचे स्वागत वीर सावरकर, सेंट्रल चौक येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, सुनिल बंडगर, मिलन कल्याणशेट्टी, nanhu korabu अविनाश मडिखांबे, शिवशरण जोजन, शिवशरण वाले, दयानंद बिडवे, संजय भागानगरे येथे माजी आ.सिध्दाराम म्हेत्रे, न.प. विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी, राष्ट्रवादीचे ता.अध्यक्ष दिलीप सिध्दे, शिवराज स्वामी यांनी स्वागत केले.
श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे प्रसिध्द असलेल्या श्रीराम गल्ली मंडळाने वाराणसी गंगा आरतीचे जिवंत देखावा सादर केला.
जय हनुमान वडार गल्लीने मल्लखांबदेखावा, जय जवान गल्ली प्रगतशीलशेतकरी, शिवाजीनगर तांडा गणेश मंडळ गरुडदेखावा, श्री स्वामी समाधी मठाने केदारनात महा प्रलय, नवाश्या गणेशोत्सव मंडळाकडून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा समर्थ महाप्रसाद सेवा देखावा, बेडर गल्ली गणेश मंडळ चांद्रयान , पंजाब तामील गणेश मंडळ : चांद्रयान देखावा, श्रीकृष्ण गणोशोत्सव मंडळ : शेतकरी आत्महत्या, ब्रह्मांडनायक समर्थनगर गणेश मंडळ : अयोध्या राम मंदिर देखावा, आझाद गल्ली मंडळाने : सिद्धयप्पा मंदिर देखावा, माळी गल्ली : अखंड भारत देखावा, नवभारत तरुण मंडळ : चांद्रयान , पागा चाल: गोहत्या बंदी , हरवाळकर गल्ली : संसद भवन, बंजारा समाज शिवाजी नगर : कालिका देवी अवतार, सुभाष गल्ली: फुलांनी सजविलेल्या लिंग व शंकर , संभाजी राजे मित्र मंडळ ओडिसा येथील रेल्वे अपघात देखावा वेदा चौक मंडळाने चंद्रया न देखावा रामनगर गणेश मंडळ चंद्रयान देखावा वरदविनायक गणेश मंडळ संजय नगर खालापूर येथील दरी कोर्स जळलेली देखावा वस्ती गणेश मंडळ केदारनाथ देखावा मर गणेश मंडळ वेता चौक बारा ज्योतिर्लिंग दर्शन आदी मंडळांनी विविध देखावे सादर केलेले होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या अधिन राहून मिरवणूकीतील मंडळांनी वाजंत्री बंद करून गणपती बप्पा मोरय्या पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात श्रींचे विसर्जन करण्यात आले.