गणेश हिरवे यांना राज्यस्तरीय जनरत्न कार्यप्रतिमा भूषण पुरस्कार प्रदान
सामाजिक कार्यकर्त्याचा सन्मान
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/FB_IMG_1696771895992-780x470.jpg)
गणेश हिरवे यांना राज्यस्तरीय जनरत्न कार्यप्रतिमा भूषण पुरस्कार प्रदान
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
सुभाष मुळे
पुणे प्रतिनिधी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
मुंबई जोगेश्वरी पूर्व येथील आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, वृत्तपत्रलेखक गणेश हिरवे यांना महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संथेच्या विशेष सहकार्याने आणि इनोव्हेटिव मानबिंदू प्रकाशन व अमरदिप बालविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यप्रतिमा जनरत्न भूषण पुरस्कार (गोल्डन स्टार एक्सलंस अवॉर्ड) प्रमुख पाहुणे डॉ एस एन पठाण, तहसीलदार सुनील सावंत, मराठी लोकप्रिय अभिनेते संजय मोने, आयोजक एन डी खान, GST विभागाच्या डेप्युटी कमिशनर मोंडकर मॅडम यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी वाशी येथील मराठी साहित्य मंदिर सभागृहात प्रदान करण्यात आला.हिरवे सरांचे काम जबरदस्त असून सामाजिक क्षेत्रा बरोबरच इतर अनेक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय काम अविरतपणे सुरूच असते. करोना काळात देखील हिरवे यांनी अतुलनीय काम केलं होत.हिरवे यांना आतापर्यंत विविध रज्य व राष्ट्र स्तरीय असे १२४ पुरस्कार मिळाले असून एकूण ३५ वेळा रक्तदान व १७ वेळा प्लेटलेट्स डोनेट केले आहेत. त्यांच्या सारखे अग्रेसर राहून काम करणाऱ्या व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी असतील त्या संस्थेसाठी, आस्थापनासाठी ते नक्कीच भूषणावह आहे.पुरस्कार मिळाल्याने हिरवे सरांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)