काष्टी येथे सर्वरोग निदान शिबिर संपन्न!
सिद्धिविनायक नेत्रालयच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रोटरी ब्लड बँक दौंड,आर्या डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २ऑक्टोबर रोजी सर्वरोग निदान शिबिर संपन्न

काष्टी येथे सर्वरोग निदान शिबिर संपन्न!

काष्टी येथे. सिद्धिविनायक नेत्रालयच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रोटरी ब्लड बँक दौंड,आर्या डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २ऑक्टोबर रोजी सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले.या शिबीराचे उद्घाटन इम्पाचे अध्यक्ष डॉ.राजेश पाखरे,श्रीमती सुनंदा पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबीरासाठी डॉ.प्रफुल्ल चौधरी, डॉ.कल्याणी चौधरी, डॉ.अनिल शिंदे,डाॅ.बाळासाहेब पवार, डॉ.किरण पवार, डॉ.संतोष काकडे, डॉ.अनिल कोकाटे, डॉ.नवनाथ कोल्हटकर, डॉ.विश्वास भापकर, डॉ.संजय टकले , डॉ.पांडुरंग दातीर, डॉ.निलेश कपिल , डॉ.चेतन साळवे, डॉ.ज्ञानेश्वरी राहींज , डॉ.अभिजीत तिवाटणे ,सुनिल पाचपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबीरामध्ये २००हुन अधिक जणांनी शिबीराचा लाभ घेतला.त्याचबरोबर रक्तदान करणार्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.शिबीर यशस्वी करण्यासाठी सिद्धिविनायक नेत्रालयाचे संचालक अक्षय शेलार व व्यवस्थापक घनश्याम गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले.आभार डॉ.निलेश कपिल यांनी मानले.

