भाविकांच्या भक्तीला दाद देत वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाचे उत्तम नियोजन.
स्वामी दर्शनानंतर चिमूर भाजपाचे विद्यमान आमदार बंटी भांगडिया यांचे मनोगत.

भाविकांच्या भक्तीला दाद देत वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाचे उत्तम नियोजन.

स्वामी दर्शनानंतर चिमूर भाजपाचे विद्यमान आमदार बंटी भांगडिया यांचे मनोगत.

(अ.कोट, श्रीशैल गवंडी, दि.०९/०५/२५) येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे, त्यामुळे स्वामीभक्त हे स्वामींच्या या मूळस्थानी आवर्जून येत असतात व अत्यंत भक्ती भावाने स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत असतात. ही बाब लक्षात घेऊनच मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली भाविकांच्या भक्तीला दाद देत वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाचे उत्तम नियोजन असल्याचे मनोगत
चिमूर भाजपाचे विद्यमान आमदार बंटी भांगडिया यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार बंटी भांगडिया यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी आमदार बंटी भांगडिया बोलत होते. पुढे बोलताना आमदार भांगडिया यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे कार्य हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने चालत असल्याचे पाहून समाधान वाटले आहे. मंदिर समितीच्या या कार्यास आपली नेहमीच साथ असून आवश्यक ते सहकार्य करण्यास आपण तत्पर असल्याचे मनोगतही व्यक्त केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, मा.नगरसेवक मिलन दादा कल्याणशेट्टी, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रदीप पाटील केदार माळशेट्टी, कांतु धनशेट्टी, पवार, शिवशंकर स्वामी, लखन झंपले, नागराज कुंभार इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – आमदार बंटी भांगडिया यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
