श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच व गळोरगीकरांचा आदर्श सामाजिक बांधिलकी जपत सलग २४ वर्षांची रक्तदानाची अखंड परंपरा
ता. अक्कलकोट मौजे गळोरगी येथील श्री रेवणसिध्देश्वर यात्रा महोत्सव निमित्त श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच गळोरगी आणि गळोरगी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात एकुण ४३ जणांनी रक्तदान केले. रक्तदानाचे हे सलग २४ वे वर्ष होते. मागील २४ वर्षापासुन सर्व गळोरगीकरांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या गावच्या यात्रेनिमित्त रक्तदान यशस्वीपणे राबवुन संपुर्ण सोलापुर जिल्हयात रक्तदान बाबतचा एक नविन आदर्श घडविला आहे. प्रारंभी रत्तदान शिबिराचे उदघाटन ग्रामपंचायत सदस्य श्री मल्लिनाथ बडदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज फोटो पुजन वे. शरणय्या स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ए बी फॅार्मास्युटीकल्स पुणेचे श्री संतोष बिराजदार यांनी केले. सर्व रक्तदात्यांचे, उपस्थितांचे व आयोजकांचे आभार माजी सरपंच श्री वहीदपाशा शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पणे पाडण्यासाठी श्री प्रकाश मैंदर्गी, श्री महेश बिराजदार , वे. विनायक स्वामी, श्री शिवपुत्र पाटील, श्री सागर अंदोडगी (software engineer), श्री चेतन निरोणे, श्रीनाथ बिराजदार (Gov Contractor),श्री मल्लिनाथ मैंदर्गी (पुणे),श्री मल्लिनाथ बिराजदार,श्री मल्लुराज पाटील, श्री लक्ष्मण झग्गे,श्री सिध्दाराम जकापुरे, श्री राजशेखर बिराजदार ,श्री राचप्पा बिराजदार, कु आकाश बिराजदार,श्री शशिकांत सुतार, श्री नागेश संगापुरे, श्री सिध्दाराम बगले,श्री दिनेश सन्नके( कलकर्जाळ), श्री संतोष बणजगोळ,श्री शांतप्पा पुजारी ,श्री पिरप्पा पाटोळे व श्री कैलास आळगी आदींनी परीश्रम घेतले. यावेळी माजी सोसायटी चेअरमन श्री भिमाशंकर आजुरे, पोलीस पाटील श्री सुरेश मैंदर्गी, श्रीकांत बिराजदार सर(मुंबई) श्री नागेश आळगी( सर), L I C M D R T मेंबर श्री शिवानंद बिराजदार, श्री गौरीशंकर भरमशेट्टी (हन्नुर),माजी सरपंच श्री मच्छिंद्र बनसोडे, श्री संतोष जमादार, श्री राजशेखर पाटील, श्री खाजेभाई नदाफ, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सुरेश हत्तरकी, श्री पृथ्वीराज बिराजदार, युवा मंच अध्यक्ष श्री सिध्देश्वर बिराजदार , श्री उमेश बणजगोळ व गळोरगी ग्रामस्थ उपस्थित होते.