गावगाथा

श्री स्वामी समर्थ रुग्णालयात १८ फेब्रुवारी रोजी होमिओपॅथिक शिबिर

रविवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत संपन्न होणार आहे.

श्री स्वामी समर्थ रुग्णालयात १८ फेब्रुवारी रोजी होमिओपॅथिक शिबिर

HTML img Tag Simply Easy Learning    

(अक्कलकोट, दि.१३/२/२४) –
(श्रीशैल गवंडी) – 
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होप फॉर होपलेस मोफत एकदिवसीय होमिओपॅथिक शिबिर रविवार दिनांक १८ फेब्रुवारी
रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत संपन्न होणार आहे. देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास समोरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात हा शिबीर संपन्न होईल. या शिबीरात मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर, मुकबधीर, शारिरीक व्यंग, मानसिक अधू इत्यादी विकारांवर २० वर्षाखालील मुला मुलींची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. या शिबिरात मुंबई येथील डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे तज्ञ संस्थापक डॉ.अंबरीश विजयकर, डॉ.प्रदीप विजयकर, डॉ.तन्मय विजयकर, डॉ.अपर्णा सामळ, डॉ.श्वेताली विजयकर, डॉ.क्षितिज जोशी, रजत मालोकर, अभिषेक पवार, आदी तज्ञ डॉक्टर्स रुग्णांना औषधोपचार तपासणी व मार्गदर्शन करतील तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button