गावगाथा

नागणसुर कन्नड मुली – मुले शाळेत फन-फेअर उत्साहात..

अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली व मुले शाळेत आयोजित फन-फेअर 2025 मोठ्या उत्साहात पार पडले.

नागणसुर कन्नड मुली – मुले शाळेत फन-फेअर उत्साहात…
अक्कलकोट –
अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली व मुले शाळेत आयोजित फन-फेअर 2025 मोठ्या उत्साहात पार पडले.
लहानपणापासून विद्यार्थ्यांचा अंगी स्वावलंबन आणि स्वतःचा पायावर उभे राहण्यासाठी तसेच व्यावहारिक दृष्टीकोन वाढीसाठी पुढील जीवनात उद्योजक होण्यासाठी फन – फेअर 2025 आयोजित केले होते.कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामिजी होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायत सदस्य ओंकार गंगोंडा होते.प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाधर भोसगी,बसनिंगय्या स्थावरमठ यांच्या हस्ते करण्यात आले.व्यासपीठावर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष बसवराज खिलारी ,केंद्रीय मुख्याध्यापक विद्याधर गुरव , श्रीशैल दोडमनी,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बसवराज तेग्गीनकेरी, गजानंद रेवी,प्राचार्य शंकर व्हनमाने,बसवराज धनशेट्टी बाळकृष्ण म्हेत्रे,भीमाशंकर चौगुले,मलकप्पा हिप्परगी,बसवराज दोडमनी, श्रीशैल फुलारी,आदी उपस्थित होते.सर्व मान्यवरांचे हस्ते नुकतेच मुंबई पोलीस म्हणून नियुक्त झालेले नागणसुर गावचे ऐश्वर्या क्यातनकेरी, काजल गंगोंडा,नागेश नागलगांव,चंद्रकांत माशाळकर यांना गुलाब पुष्पवृष्टी करत सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.
त्यानंतर कन्नड मुली शाळेतील विद्यार्थिनींनी एकूण 35 स्टॉल व मुले शाळेतील विद्यार्थी 10 स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामध्ये भेळ ,पावभाजी,मस्कापाव,व्हेज पॅटीस,मसालाडोसा,बासुंदी,बदाम शेक,पेढा,रसना,पाणीपुरी,दहीपुरी,मिसळपाव,इडली, कांदाभजी ,मिरची भजी,गुलाब जामुन, ढोकळा,संगम वडा,सँडविच,फिंगर चिप्स,मसाला दूध,मठ्ठा, सोनपापडी,पापड,चहा,दाल राईस,आइस्क्रीम,कुल्फी,समोसा,कॉफी तसेच मनोरंजन खेळ असे विविध स्टॉल उभारून प्रत्येक स्टॉलधारक 500 ते 2000 रुपये पर्यंत विक्री करून एका दिवसाचे कमाई त्यांचा आईवडिलांच्या हाती दिले आहे.प्रत्येक स्टॉल धारक विद्यार्थ्याला 200 ते 1000 रुपये लाभ झाले आहे . नागणसुर महसूल गावातील एच.जी.प्रचंडे प्रशाला,शेळके प्रशाला,जिल्हा परिषद मराठी शाळा,लिंबितोट वस्ती,बंधूनगर वस्ती, नागलगांव वस्ती,इंदिरानगर वस्ती कन्नड मराठी,उर्दू शाळेतील सर्व शिक्षक,विद्यार्थी फन फेअर ला भेट देऊन प्रत्येक स्टॉल ला भेट देत खाद्यपदार्थ खरेदी करून खाऊन एन्जॉय केले.दुपारी 2.00 वाजेपर्यंत शाळेच्या आवारात पालक,ग्रामस्थ गर्दी केले होते.विद्यार्थ्यांचे व्यावहारिक दृष्टीकोन पाहून आनंद व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शरणप्पा फुलारी यांनी केले तर आभार राजकुमार नरूणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विषय शिक्षक शरणप्पा फुलारी,राजशेखर खानापुरे,राजकुमार नरूणे,राजशेखर कूर्ले, शांताबाई तोळणूरे,बसय्या स्वामी,खाजप्पा किणगी समवेत विद्यार्थी पालक परिश्रम घेतले.
फोटो ओळ -1:-
नागणसुर कन्नड मुली – मुले शाळेत फन-फेअर प्रसंगी डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांच्या स्वागत करताना गंगाधर भोसगी, श्रीशैल दोडमनी, ओंकार गंगोंडा,बसवराज तेग्गीनकेरी,बसवराज खीलारी,बसवराज स्वामी आदी दिसत आहे.
फोटो ओळ 2:-
नागणसुर कन्नड मुली – मुले शाळेत फन-फेअर प्रसंगी नुकतेच मुंबई पोलीस क्षेत्रात निवड झालेल्या काजल गंगोंडा,ऐश्वर्या क्यातनकेरी,नागेश नागलगांव,चंद्रकांत माशाळकर यांच्या सत्कार करताना डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामिजी,गंगाधर भोसगी, श्रीशैल दोडमनी, ओंकार गंगोंडा,बसवराज तेग्गीनकेरी,बसवराज खीलारी,बसवराज स्वामी आदी दिसत आहे.
फोटो ओळ -3:-
नागणसुर कन्नड मुली – मुले शाळेत फन-फेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या स्टॉल वरती झालेल्या गर्दी..

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button