प्रसिध्द अडत व्यापारी व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे कुटुंबियांचे बेळगाव येथे नुकतेच स्नेहसंमेलनासह सहस्त्रचंद्र दर्शन व हिरक महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
याप्रसंगी विशेष सत्कार राजमती कोल्हापुरे, कुसुमावती गरगट्टे, प्रमिला मोहिरे, सुभाषचंद्र वनकुद्रे, सुरेश कंदले, अणदूर यांच्यासह १७ जणांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न झाला.

*🔶अक्कलकोट :* ( प्रतिनिधी)
*श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील प्रसिध्द अडत व्यापारी व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे कुटुंबियांचे बेळगाव येथे नुकतेच स्नेहसंमेलनासह सहस्त्रचंद्र दर्शन व हिरक महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.*

बेळगाव येथील गेटटुगेदर धर्मनाथ भवन येथे न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या आजी, आजोबा स्व.लक्ष्मणराव (जाजा) राघोबा खोबरे व स्व. रत्नाबाई लक्ष्मणराव खोबरे यांच्या परिवारातील जणांचा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्नेहसंमेलनासह, सहस्त्रचंद्र सोहळा व हिरक महोत्सव, मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी शांतीनाथ व सहस्त्रनाम विधान करण्यात आले. सदरचा विधान कार्यक्रम अमोल पंडित बेळगाव यांनी केले. परिवारातील ८१ वयाच्या पुढील २२ जणांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आणि ७५ ते ८० वर्ष असलेल्या परिवारातील २५ जणांचा हिरक महोत्सवानिमित्त खोबरे, वनकुद्रे, कोल्हापुरे, गरगट्टे, मोहिरे यांच्याकडून सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विशेष सत्कार राजमती कोल्हापुरे, कुसुमावती गरगट्टे, प्रमिला मोहिरे, सुभाषचंद्र वनकुद्रे, सुरेश कंदले, अणदूर यांच्यासह १७ जणांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न झाला.

*⭕चौकट :*
विज्ञान मानव जातीच्या कल्याणासाठी वापरायचे असल्यास धर्माचे संस्कार अत्यावश्यक आहेत. शस्त्राला धार असल्यास छान कापता येत हे झाले विज्ञान . पण सर्जनने वापरले तर रोगी वेदना मुक्त होतो आणि खिसे कापूने वापरल्यास दुःखदायक होतं. धर्म आपल्याला पावर कंट्रोल करायला आणि योग्य ठिकाणी वापरायला शिकवतो. म्हणून विज्ञान आणि धर्माची युती आवश्यक आहे. आणि या धर्माची शिकवण आणि प्रभावना करणारा कालचा महोत्सव तरूण पिढीला मार्गदर्शन करणारा होता.

परिवारातील जेष्ठांनी आम्हा सर्वांना सख्खे, जवळचे, लांबचे असा भेदाभेद न करता निरपेक्ष प्रेम केलेत आणि करायला शिकवलेत. परंपरा, रुढी कटाक्षाने पाळल्या आणि पाळायला लावल्या. कधी गोडी गुलाबीने तर कधी किंचित कठोरपणे. अर्थात त्यामागे आम्ही शिकावे ही एकच भावना आपली होती. आपल्या आईवडिलांचा , माहेरच्या संस्कारांचा जाज्वल्य अभिमान कायम ठेऊन सासरच्या प्रत्येकाला आपलसं केलं. सतत कष्ट, अगत्य, सदैव मदतीला हात पुढे करून, भरपूर आणि निरपेक्ष प्रेम करून स्वतः चे स्वतंत्र स्थान निर्माण केले.

प्रत्येकाची आवड निवड ओळखायची, लक्षात ठेवायची आणि ती पुरी करायला धडपडायची अलौकिक कला तुमच्या कडे जन्मजात आहे. त्या बरोबर शास्त्राभ्यास, पूजा अर्चा, दानधर्म, साधना तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक सुंदर आणि सुबक करते. या परिवारातील समारंभामुळे ओसंडणारा आनंद सर्वांना प्रफुल्लीत तर करुन गेलाच पण आमच्यात नवी उर्जा निर्माण झाली. सर्व मुलांना आपलं तुमच्यावर असलेलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल शतशः कृतज्ञता.
*-उषा धन्यकुमार खोबरे* (हुबळी)
*⭕चौकट :*
सहस्त्रचंद्र दर्शन :
राजमती कोल्हापुरे, कुसुमावती गरगट्टे, प्रमिला मोहिरे, सुभाषचंद्र वनकुद्रे, सुरेश कंदले (अणदूर), विमलचंद कोल्हापूरे, सुमंगला कोल्हापुरे, प्रभावती कुत्ते, पुष्पा वनकुद्रे, शेवंता गरगट्टे, लिला बुरसे, सुनिता कोल्हापुरे, रामण्णा कस्तुरी, नेमीनाथ इंगळे, गंभीर भडाळे, शांताबाई गरगट्टे, विनोदनी विभूते (सोलापूर).
*⭕चौकट :*
*हिरक महोत्सव :*
अशोक खोबरे, प्रभाकर वनकुद्रे, अरुण लेंगडे, हर्ष मोहिरे, चंद्रकांत भडाळे, बेबी लेंगडे, विजया वनकुद्रे, उषा खोबरे, नलूताई लेंगडे, ललिता कंदले, डॉ.हंजी.