स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

श्री वटवृक्ष मंदिरात नामवीणा सप्ताहास सुरुवात

परंपरेप्रमाणे इंगळे परिवाराकडून वीणा सप्ताहास प्रारंभ

श्री वटवृक्ष मंदिरात नामवीणा सप्ताहास सुरुवात

HTML img Tag Simply Easy Learning    

परंपरेप्रमाणे इंगळे परिवाराकडून वीणा सप्ताहास प्रारंभ

HTML img Tag Simply Easy Learning    

येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अखंड नामवीणा सप्ताहाची सुरुवात आज दिनांक ११ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता झाली. या नामवीणा सप्ताहाचा शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत प्रथमेश महेश इंगळे यांचे हस्ते करण्यात आले. प्रारंभी वटवृक्ष मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात वीणापूजन मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते होऊन सत्संग महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले. तदनंतर मंदार महाराजांच्या अधिपत्याखाली प्रदीप हिंडोळे यांच्या हस्ते प्रथमेश इंगळे यांच्या हाती वीणा देण्यात आले. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात अखंड नामविणा सप्ताहास अनन्य साधारण महत्व असून सतत ७ रात्र आणि दिवस हा वीणा खाली न ठेवता मुखाने स्वामी नाम घेत अखंड चालू ठेवणेची परंपरा आज देखील देवस्थानने जपली आहे. श्रद्धेय भक्ती भावाने स्वामी भक्त या सेवेत सहभागी होत असतात. या वीणा सप्ताहात इच्छूक भाविकांना १ तास वीणा हाती घेण्याची स्वामी सेवेची संधी देण्यात येते. इंगळे परिवाराच्या वतीने वीणा सप्ताहाची सुरुवात करण्याची ही तिसरी पिढी आहे. या पुढील सात दिवस या नामवीणा सप्ताहात अनेक भाविक सहभागी होवून श्रींच्या चरणी सेवा अर्पण करतात. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी रोजी सकाळी ७ वाजता या वीणा सप्ताहाची समाप्ती होते.
याप्रसंगी मंदिर समिती सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, इरपा हिंडोळे, कौशल्या जाजू, प्रदीप हिंडोळे, अक्षय सरदेशमुख, बाबर, निर्मलाताई हिंडोळे, सुरेखा तेली, स्वाती गंभीरे, भंडारे, प्रसाद सोनार, बाळासाहेब घाटगे, प्रसन्न हत्ते, नागनाथ गुंजले, गिरीश पवार, सुभाष पेठकर, संजय पवार, संतोष पराणे, ऋषिकेश लोणारी, शिवाजी यादव, सचिन हन्नूरे, सागर गोंडाळ, अनिल हवले, दत्ता वाघमारे व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ — नामवीणा सप्ताह शुभारंभ प्रसंगी महेश इंगळे व प्रथमेश इंगळे, प्रदीप हिंडोळे व इतर दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button