अक्कलकोट शहर कोष्टी समाजाच्यावतीने गुरुवारी वागदरी रोडवरील शरण मठ येथे श्री श्री श्री चिक्करेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी यांना श्रध्दांजली
अक्कलकोट शहरातील हटगार कोष्टी समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अक्कलकोट, दि.30 : अक्कलकोट शहर कोष्टी समाजाच्यावतीने गुरुवारी वागदरी रोडवरील शरण मठ येथे श्री श्री श्री चिक्करेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी यांना श्रध्दांजली वाहिली. याप्रसंगी शहर अध्यक्ष शिवशंकर बाबा, महिला अध्यक्षा सुनंदा अष्टगी, अनिल करजगी, पप्पू आळंद, शहर महिला अध्यक्षा महादेवी नंदर्गी, मल्लू कवंची, राजु दुधगी आदींनी शोकसभेत श्रध्दांजली वाहिली.

श्री श्री श्री चिक्करेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी यांचा जन्म ऑक्टोबर 1958 रोजी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील हुल्याळ गावातील पुराणिक रत्न श्री मल्लिकार्जुन शास्त्री कोन्नूर आणि आई अवक्का यांच्या पवित्र उदरी झाला.त्यांनी बी.ए.पदवी पूर्ण केली. 1981 मध्ये अक्कलकोटाचे श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण मठाचे तिसरे उत्तराधिकारी म्हणून विराजमान झाले. तेव्हापासून आजतागायत जगद्गुरु देवर दासीमय्यांच्या हटगार कोष्टी समाजाचे जगद्गुरू म्हणुन सुमारे 42 वर्षे अध्यात्माच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली.श्री चिक्क रेवणसिध्द शिवशरण स्वामीजी यांनी अहोरात्र परिश्रम करून अनेकांना आध्यात्मिक मार्गदर्शन देवून पुराण प्रवचन द्वारे ज्ञान उध्दार केला. जातीभेद झुगारुन सर्व कुळातील लोकांना ऊपदेश करून भक्त समुदाय वाढविला. भक्तांचे हृदय परिवर्तन केले.पापी कृतीपासून परावृत्त करून सन्मार्गी लावले.आपला देह चंदना परी झिजवून भक्तांचा उध्दार केला.

शिवाअदवैत भूषण, श्री चिक्क रेवणसिध्द महास्वामीनी हजारो भक्तांना घेवून हुबळी, मुदनूर, श्रीशैल, कुडल संगमा, सिध्दनकोळळा असे अनेक पदयात्रे द्वारे पुण्य क्षेत्रांना भेट दिली. हजारो भक्ताचा उध्दार केला. शाखामठ गुळेदगुडड येथे लाखो रूपये खर्च करून शिवानुभव मंगल कार्यालय बांधले. हुबळी येथे नविन श्री रेवणसिध्द शिवशिरण मंदीर बांधुन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना केली.कुंभमेळा जपयज्ञ,लक्ष दिपोत्सव असे अनेक कार्यक्रम करून भक्तांचे जिवन सार्थक करुन त्यांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एकाच वेळी सुमारे 52 मठांचे काम पाहिले. त्यांनी सामाजिक,शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात चांगले काम केले असून हुबळी येथे श्री रेवणसिद्ध शिवशरण या नावाने शैक्षणिक संस्था सुरू करून ङघॠ ते झणउ पर्यंतचे शिक्षण दिले. अक्कलकोट येथील श्री रेवणसिध्द शिवशरण मठात गरीब विद्यार्थ्यांची भोजन व निवासाची व्यवस्था करून हजारो मुलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. अशा पद्धतीने आपल्या धर्मगुरूंनी वयाच्या 65 व्या वर्षी देहत्याग केला.आजाराने त्रस्त असलेले श्री स्वामीजीनी लिंगसुगुर येथील अन्नदान गौडा भैय्यापूर रूग्णालयात देहत्याग केला.त्यांनी आदी हुबळीच्या शरण मठातच समाधीस्त व्हावे असे निर्णय घेतला होता.पण शेवटच्या क्षणी गुडदनाळ शरण मठात समाधी करावे असे सुचविले होते.स्वामीजी लिगैक्य झाल्याची वार्ता पसरताच देशाच्या विविध भागातून धर्मगुरू, आमदार ,राजकीय नेत्यांसह मोठया संख्येने भाविक गुडदनाळ गावात दाखल झाले आणी दर्शन घेतले. मंगळवार रात्री प्रवचन व भजनाचा कार्यक्रम पार पाडला. बुधवार दि.27/09/2023 रोजी सकाळी 8 वा. गुडदनाळ गावात सर्व भक्तगण व भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हंपीचे पूज्य श्री दयानंदपुरी महास्वामीजी, गुळेदगुड येथील पूज्य श्री बसवराज पट्टदार्रय महास्वामीजी, हुबळीचे श्री शिवशंकर महास्वामीजी,इंचालचे श्री शिवानंद भारती महास्वामीजी,बिदरचे श्री शिवकुमार महास्वामीजी, श्री गणेशानंद स्वामीजी, श्री पानवानंद स्वामीजी मुचलंबा, निजगुणी देव हुणशाळ, असे दोनशेहून अधिक पूज्य व अककलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले उपस्थित होते, अक्कलकोट, वागदरी, मैंदर्गी, वळसंग, गुलेदगुड्ड, बागलकोट, गुलळेदगुड्डा. मदनहिप्पारा,तोळणूर,हिरोळी, विजयपूर,दुधनी अशा अनेक ठिकाणाहून हजारो भाविक आले होते. गुरूंच्या आशीर्वादाने श्री मठाच्या भक्तांनी अविरतपणे आलेल्या भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, दिवाबत्ती, सावलीसह विविध सुविधा उपलब्ध होत्या.

अक्कलकोट येथील श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण मठाचे शिष्य परंपरा विणकर समाजाने अंतिम दर्शनासाठी गुडदनाळ येथे मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. अक्कलकोट येथे त्यांचा मुख्य मठ असून हुबळी, कलबुर्गी, आळंद,गुळेदगुडड रायचूर सोलापूर यासह देशभरात त्यांनी अनेक शाखा बांधल्या आहेत.त्याद्वारे लाखो भक्तगण जोडले असल्याचे आयोजित शोकसभेत समाजातील विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. याप्रसंगी अक्कलकोट शहरातील हटगार कोष्टी समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
