गावगाथाठळक बातम्या

Municipal Council / Nagar Panchayat Elections | अखेर बिगुल वाजलं… बहुप्रतिक्षित २४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या घोषणा.. असा असेल संपूर्ण कार्यक्रम…

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे (प्रतिनिधी): गेल्या अनेक दिवसांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची प्रतिक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगरपालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल.

HTML img Tag Simply Easy Learning    

राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. १० डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.

HTML img Tag Simply Easy Learning    

असा असेल निवडणूक कार्यक्रम..

अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५

HTML img Tag Simply Easy Learning    

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५

HTML img Tag Simply Easy Learning    

अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५

अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर २०२५

आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत – २५ नोव्हेंबर २०२५

निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी – २६ नोव्हेंबर २०२५

मतदान – २ डिसेंबर २०२५

मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५

निकाल जाहीर करण्याचा दिवस – १० डिसेंबर २०२५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button