चपळगाव यात्रेनिमित्त पाणपोईचा ग्रामपंचायत सदस्य महिबूब तांबोळी यांच्या संकल्पनेतून उपक्रमाचा शुभारंभ..
ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त पाणपोईची व्यवस्था केली आहे

चपळगाव यात्रेनिमित्त पाणपोईचा ग्रामपंचायत सदस्य महिबूब तांबोळी यांच्या संकल्पनेतून उपक्रमाचा शुभारंभ…

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत.गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्राही भरत आहेत.यात्रेसाठी गाव परगावातील असंख्य भाविक येत असतात,ही गरज ओळखून चपळगाव ग्रामपंचायतचे सदस्य महिबूब तांबोळी यांनी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त पाणपोईची व्यवस्था केली आहे. दरवर्षी तांबोळी हे ग्रामदैवत यांच्या यात्रेनिमित्त पाणपोईची व्यवस्था करतात,हे विशेष..!

यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी या पाणपोईचा शुभारंभ सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते सिध्दाराम भंडारकवठे,युवा नेते बसवराज बाणेगांव, गौरीशंकर म्हमाणे सर,
ग्रा.पं.सदस्य गणेश कोळी,उद्योजक मनोज इंगुले,विशालराज नन्ना,उद्योजक लक्ष्मण पाटील,वाहिद पटेल,अंबण्णा पाटील सर,अप्पाराव म्हमाणे, विजयकुमार कोरे,बसवराज बऱ्हाणपूरे,मोनप्पा दुलंगे, महंमद फुलारी,शंकरराव हारके,चंद्रकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
महिबुब तांबोळी यांनी राबविलेला उपक्रम माणुसकीचा आहे.यामुळे परगावहुन आलेल्या भाविकांची चांगली सोय होणार असल्याचे सरपंच उमेश पाटील यांनी व्यक्त केली.सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असुन महिबुब तांबोळी यांनी राबविलेल्या माणुसकीच्या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून व्यक्त होत आह
