यशोगाथा

प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रीशैल झाला ‘अग्निवीर’, दुधनीतील युवकाची यशोगाथा

अग्निवीर', दुधनीतील युवकाची यशोगाथा

प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रीशैल झाला ‘अग्निवीर’, दुधनीतील युवकाची यशोगाथा

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट : तालुक्यातील दुधनी येथील एका गरीब कुटुंबातील तरुणाला वयाच्या १९व्या वर्षी अग्निपथ योजनेद्वारे भारतीय नौदलात चार वर्षांसाठी व्यावसायिक सैनिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्रीशैल गुरुशांत माशाळ अस या तरुणाचे नाव आहे. श्रीशैल यांचे आर्थिक स्थिती जेमतेम असून आईची प्रेरणा व स्वतःची जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्याने यश संपादन केले. श्रीशैलचा प्राथमिक शिक्षण रुद्देवाडी येथील मातोश्री लक्ष्मीबाई करवीर प्राथमिक आश्रम शाळा येथे झाले तर ८ वि ते १० वि पर्यन्तचा शिक्षण दुधनी येथील एस. जी. परमशेट्टी हायस्कूल येथे झाले. त्यानंतर ११ वि आणि १२चा शिक्षण विज्ञान शाखेतुन दुधनी येथील श्री गुरुशांतलिंगेश्वर ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्रीशैल माशाळ हा दुधनी येथील कै. गुरुशांत माशाळ यांचे चिरंजीव आहे. श्रीशैल अवघ्या ६ वर्षाचा असताना वडिलांचा छत्र हरपला. त्याच्या वडिलांचा २००९ साली रेल्वे अपघातात निधन झाले. त्यानंतर त्याची आई महानंदा माशाळ यांनी काबाड कष्ट करून तिन्ही मुलांचे संगोपन करत लहांनांचा मोठे केले. त्यांनी तिन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अपार मेहेनत घेतले. घरभाडा, किराणा आणि इतर खर्चासाठी आईचे पगार कमी पडत असल्याने तिन्ही मुले शाळेतून घरी परतल्या नंतर छोटे मोठे काम करून ते स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भरून काढत होते. श्रीशैल हा आपल्या आई आणि दोन भावासह भाजीपाला मार्केट परिसरातील लक्ष्मीनगर येथे एका भाड्याच्या घरात राहतात. श्रीशैलचा भाऊ आरूनकुमार हां मेकॅनिकल इंजियरिंगचा तिसऱ्या वर्षात शिकत आहे तर तिसरा भाऊ दहावीचा पेपर दिला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्रीशैल हा ओडिशा येथील आयएनएस चिलका येथे चार महीने बेसिक सराव पूर्ण करून शनिवारी गावी परतला. दहा दिवसांच्या सुटतीनंतर तो परत लोणावळा येथे प्रोफेशनल ट्रेनिंगसाठी रवाना होणार आहे जेव्हा श्रीशैल घरी परतला तेव्हा त्याच्या घराजवळील रहिवाशी आणि मित्रानी हार, पुष्पगुच्छ पेढे भरवून जोरदार स्वागत केले. यावेळी आपल्या मुलाला भारतीय नौदलाच्या पोषाखात पाहून त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button