प्रेरणादायक

सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मा.राज बापू सलगर यांना स्व.वीरभद्रेश बसवंती सेवागौरव पुरस्कार_२०२३ प्रदान केल्यानंतर त्यांची मनोगत

एक सामाजिक कार्यकर्त्याचा सन्मान

सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मा.राज बापू सलगर यांना स्व.वीरभद्रेश बसवंती सेवागौरव पुरस्कार_२०२३ प्रदान केल्यानंतर त्यांची मनोगत…

HTML img Tag Simply Easy Learning    

#अशक्यतेला_भिडायच_वेड_मोजक्यांनाच_असत

HTML img Tag Simply Easy Learning    

लढत असताना भिडत असताना एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात येते की यश हे कधीच रडणाऱ्याच न्हवे तर नेहमी लढणाऱ्यांच्या मागे उभ असत हे मला आज मिळालेल्या पुरस्कारच्या माध्यमातून लक्षात येत

HTML img Tag Simply Easy Learning    

लोक कल्यान लोक सेवा करण्या साठी तुम्हाला कोणत्या पद – अधिकार किंवा प्रतिकूल परिस्तिथीची गरज असते अस नाईये गरज असते ती आपल् एक पाऊल लोक-हिताच्या दिशेने उचलण्याची बाकी आपोआप घडत राहील लोक- यश – मान – सन्मान काौतुक आपोआप सोबत येत राहील यात मला तिळ मात्र शंका नाही

HTML img Tag Simply Easy Learning    

हे करत असताना आपण आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वातून आपलं व्यक्तिमत्व त्या काळोखातील चंद्रासारखं बनवा निराशेच्या नकारात्मक विचारांच्या लक्ख अंधारातही चंद्रा प्रमाने लाखोंची नजर आपल्यावरच पडली पाहिजे तो चंद्र बनन्या साठी अंगावर
पांढरे कपडे – गाडी घोडा माग फिरणारी ढीगभर माणसं बापाने कमवून ठेवलेला खंडिभर पैसा मोठा वारसा प्रतिकूल परिस्तिथी या सर्व गोष्टी असल्याच पाहिजेत अस नाईये लक्षात ठेवा
या प्रवासात #जगणं साध असलं तरी चालेल पण तुमचं #वागणं मात्र श्रीमंत असलं पाहिजे विचार श्रीमंत असले पाहिजेत यातच सर्व काही आल कारण या आयुष्यात आपण जन्माला आल्या पासून आधार च शोधत फिरत असतो परंतु कोणाचा आधार व्हायचा प्रयत्न जेव्हा तुम्ही सुरु कराल त्या क्षणा पासून तुम्ही स्वतःला माणूस म्हणून घेऊ शकता अस मला वाटत

HTML img Tag Simply Easy Learning    

हे करत असताना आयुष्यात तुम्हाला मिळालेलं यश जितकं मोठ दिसत तितकं च त्याच्यामागे मोठं कष्ट आणिि त्याग असतो या प्रवासात आपलं कुटूंब आपले स्वकीय आपले सोबती जर खांद्याला खांदा लावून उभे असतील तर हा प्रवास नक्कीच सुखद होईल

म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते पण माझ्या यशा मागे माझ्या कुटुंबातील २ स्त्रिया आहेत एक आई तर दुसरी माझी अर्धंगिनी त्या हिशोबाने तसा मी जास्त भाग्यवान ठरतो अस माला वाटत गेल्या १५ वर्षा पासून माझ्या सारख्या फाटक्या व आयुष्याच्या वाटेला संघर्ष आलेल्या व्यक्ती सोबत कोणती ही तक्रार न करता माझ्या स्वप्नावर विश्वास ठेवून माझ्या
खांद्याला खांदा लावून स्वतःची व कुटुंबाची प्रत्येक जबाबदारी सांभाळत माझि साथ देणारी मला प्रोत्सहान देणारी कधीच मला हरू न देनारी सोबती मिळाली हे मी माझं भागयच समजतो

तुमच्या सारखे माझ्या स्वप्नावर माझ्या प्रत्येक निर्णयावर हेतुवर डोळे झाकून विश्वास ठेवणारे सखे सोबती साथी मिळत गेले लोक भेटत गेले माझ्या विचारांशी जुडत गेले तसा हा प्रवास अधिक सुखकर वाटत जातोय म्हणून् आयुष्यभर मला आपल्या या ऋणात राहायला आवडेल या पुढे ही आपण पेटवलेली ही मशाल अशीच जनकल्याणा करिता जळत राहील मी ही गवाही देतो

पुरस्कार सन्मान प्रोत्साहन देणारे या पेक्षा जबाबदार्या वाढवणारे असतात हे मी नेहमीच सांगत असतो त्या मुळे आता या खांद्यावरची जबाबदारी कैक पटीने वाढली आहे असंच मला वाटत माझ्या या पाठीवर पडणाऱ्या थापाचे खरे हकदार तर तुम्ही सारे आहात त्यामुळे मला मिळालेला हा मान सन्मान पुरस्कार मी आपल्याला समर्पित करतोय त्याचा स्वीकार करावा व माझ्या पाठीशी उभ राहून फक्त मला लढ म्हणावं हिच एक अपेक्षा व्यक्त करतो

जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते

सुखातले कित्येक नकोयत् मजला
दुःखातले मोजकेच हवेत

यशातील कौतुकाच्या थापा नकोयत मला
अपयशा नंतर ही पाठीशी खम्बिर उभे राहणारे हवेत

प्रकाशातील चमकणारे सोबती नकोयत मला
अंधारात ज्योत बनून आयुष्यातील काळोख दिपवणारे हवेत मला 🙌

राज सलगर
9096138278

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button