स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवात गोमंतक कीर्तन विद्यालयाची चक्री कीर्तन सेवा संपन्न.

गोव्यातील संत गोमंतक विद्यालयाच्या चक्रीर्तनाने भाविकांनी अध्यात्माची महती अनुभवली.

गोव्यातील संत गोमंतक विद्यालयाच्या चक्रीर्तनाने भाविकांनी अध्यात्माची महती अनुभवली.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवात गोमंतक कीर्तन विद्यालयाची चक्री कीर्तन सेवा संपन्न.

HTML img Tag Simply Easy Learning    

गोमंतक विद्यालयाच्या चक्रीकीर्तनाने गुंफले धर्मसंकीर्तनाचे चौथे पुष्प

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१०/४/२३) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गोव्यातील संत गोमंतक विद्यालयाच्या चक्री कीर्तनाने स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवातील धर्म संकीर्तनाचे चौथे पुष्प गुंफले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी कीर्तनकारांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. यावेळी संगीत विद्यालयाचे प्रमुख सुहास वझे, मानसी नाईक यांच्या पुढाकाराने बहुरंगी चक्री कीर्तनाच्या सादरीकरणाने भाविकांना भारतीय संस्कृती, रूढी परंपरा व अध्यात्माची महती समजली. या चक्री कीर्तन सेवेच्या सादरीकरणात फोंडा गोवा येथील गोमंतक संत मंडळ संचलित किर्तन विद्यालयाच्या बाल बुवा कीर्तनकारांचा चक्री कीर्तन कार्यक्रम भक्तीभावाने रंगला. या कीर्तन सेवेच्या पूर्व रंगात ह.भ.प.सर्वेश साळगावकर यांनी देवाला अनन्य होऊन शरण जावे या विषयावर सुंदर असा पूर्व रंग सादर केला. त्यानंतर ह.भ.प.मनस्वी नाईक हिने पार्वतीने घेतलेली रामाची सत्वपरीक्षा या विषयावर आख्यान केले. ह.भ.प. समीक्षा कुर्टीकर हिने सर्वांचा सद्गुरु कसा असावा असे सांगत संत तुकारामांचा अभंग सादर केला. भगवान प्रभू रामचंद्रांनी समर्थ रामदासांवर गुरुकृपा केली हे चरित्र सांगितले. विविध विषयांवरच्या या चक्री कीर्तनामुळे उपस्थित भाविकांनी अत्यंत शांतचित्ताने या कीर्तन सेवेचा लाभ घेतला. याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मोहन जाधव, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, सुवर्णा जाधव, कृष्णाबाई घाटगे, महेश मस्कले, मनोहर देगावकर, मयूर स्वामी, दीपक जरीपटके, शिवशरण स्वामी, प्रकाश पाटील, अक्षय सरदेशमुख, बाळासाहेब घाटगे, सचिन पेठकर, अविनाश क्षीरसागर, आदींसह अनेक स्वामी भक्तांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – वटवृक्ष मंदिरात कीर्तनसेवा सादरीकरण करताना गोमंतक संगीत विद्यालयाचे बालकीर्तनकार दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button