गावगाथा

अक्कलकोट विरक्त मठाचे पिठाधिपती पूज्य श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या पूज्य हस्ते धानय्य कौटगीमठ सर लिखित सेट नेट परीक्षा पुस्तक प्रकाशित …

पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न २०२४

अक्कलकोट विरक्त मठाचे पिठाधिपती पूज्य श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या पूज्य हस्ते धानय्य कौटगीमठ सर लिखित सेट नेट परीक्षा पुस्तक प्रकाशित …..

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट: येथील के एल ई मंगरूळे प्रशालेतील शिक्षक धानय्य कौटगीमठ सर लिखित सेट नेट परीक्षा पुस्तकाची प्रकाशन आज अक्कलकोट येथील विरक्त मठात विजयादशमी शुभ दिनी अक्कलकोट विरक्त मठाचे पिठाधिपती पूज्य श्री बसवलिंग महास्वामी जी पूज्य हस्ते करण्यात आला.यावेळी शिक्षिका सौ शोभा बिराजदार ,सौ संगीता कौटगी मठ , सौ सुरेखा एल ,आणि बसवणप एम आणि कुमारी अश्विनी बिराजदार उपस्थित होते.

धानय्य सरानी २००१ ते २००४ पर्यंत या या विरक्त मठात राहून शिक्षण घेतले आहे.मठाची ची ऋण व्यक्त करण्यासाठी पूज्य श्री बसवलिंग महास्वामी ची प्रतिमा त्यांच्या सेट नेट परीक्षा पुस्तकात छापून ,ही पुस्तक पूज्य श्री बसवलिंग महास्वामी जी यांच्या चरणी अर्पण केले आहे.या वेळी पूज्य महास्वामी शुभ हस्ते धानय्य कौटगीमठ सर आणि त्यांचे धर्म पत्नी सौ संगीता कौटगीमठ याची शाल श्री फळ , रुद्राक्ष ,पुस्तक देऊन सहपत्नी सत्कार करण्यात आला.
पूज्य श्री बसवलिंग
महास्वामीजी पुस्तक प्रकाशन करून पुढे म्हणाले की विद्यार्थी ध्येय ठरवून अभ्यास केला पाहिजे.विद्यार्थी होतकरू असेल तर समाज त्याना मदत करतोच .मठाचे कार्य ही तेच आहे की गोर गरीब मुलांना शिक्षण मिळाला पाहिजे. शिक्षण मुळे माणसाला पुनर्जन्म होत असतो.मठात असेन विद्यार्थी राहून स्वतःचे भविष्य निर्माण केले.आह्मी रोज समाज दिलेल्या अन्न मठात राहणारे विद्यार्थ्यांना दिलो आणि ते विद्यार्थी आज समाजात एक आदर्श व्यक्ती म्हणून जीवन जगत आहे हेच आमच्या साठी आनंदाची गोष्ट. प्रत्येक विद्यार्थी ,आई वडिलांच्या , समाजाचा , देशाच्या ऋण फेडला पाहिजे. धानय्य सरांची सेट नेट पुस्तक वाचन करूनआपणही यशवंत व्हावे हीच शुभ आशीर्वाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button