गावगाथाठळक बातम्या
Akkalkot : दिलीप सिध्दे यांच्या वाढदिवसानिमित्त बादोले येथे रक्तदान शिबीर संपन्न


अक्कलकोट (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या 65 व्या वाढदिसानिमित्त अक्कलकोट तालुका युवक अध्यक्ष शांतकुमार सलगरे यांच्या नेतृत्वाखाली बादोले गावात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये 45 जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी, सरपंच- माणिक धायगोडे, राजू सलगरे, शिवशंकर कत्ते,अपुशा पाटील, संजय पाटील, इरेश विभुते,राम मदने,लक्ष्मण धायगोडे, पुंडलिक कोरे,आकाश निंगदाळे, टेम्बी नाका कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
