गावगाथा

पुण्यात रंगले युवा कवी संमेलन

कवी संमेलन

पुण्यात रंगले युवा कवी संमेलन

काव्ययोग काव्य संस्था,वसुधा इंटरनॅशनल,भारतीय विचारधारा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा, बक्षीस वितरण व युवा कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.यावेळी उद्घाटक मा.सौ. भारती महाडिक भारतीय विचारधारा अध्यक्षा, स्वगताध्यक्षा सौ.वसुधा ताई नाईक वसुधा इंटरनॅशनल अध्यक्षा,
कार्यक्रम अध्यक्ष मा. प्रा शरदचंद्र काकडे देशमुख ज्येष्ठ साहित्यिक, विशेष उपस्थिती अभिनेता महेश रोहिणी
कवी संमेलन अध्यक्ष लावणीकार श्रीशैल सुतार ,प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक मा.जयप्रकाश झेंडे,तसेच युवा गझलकार मा.गिरीश जंगमे या वेळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तुषार पालखे ,पल्लवी पवार संपादित केलेले
मर्म या प्रतिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते झाले.तसेच कवयित्री लिना पांडे लिखित यांच्या जीवनअमृत कवितेच्या मुख पृष्ठाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.यात बालकवी यांचे ही कवी संमेलन पार पडले.विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले.समाजिक कार्य करणाऱ्या शिवहरी जंगले (PSI ), राजेश्वर हेंद्रे, शिवाजी शेलार, वर्षा नाईक, दीपाराणी गोसावी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.काव्य संमेलनात तब्बल ३५ युवा कवींनी सहभाग घेतला होता.पूर्ण महाराष्ट्रातून युवा कविंनी हजेरी लावली होती.काही कवितांनी, गझलानी रसिक वर्गाची मने जिंकली.प्रत्येक कवीला रसिकांची दाद मिळत होती.एका पेक्षा एक कविता या युवा कवींनी सादर केल्या.हे कवी संमेलन आनंदाने आणि उत्साहाने पार पडले.सादर केलेल्या युवा कवीना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन काव्ययोग काव्य संस्था पुणे अध्यक्ष मा.योगेश हरणे ,काव्ययोग काव्य संस्था पुणे उपाध्यक्ष मा.गौरव पुंडे ,पल्लवी पवार,मयुरी लायगुडे,श्रीराम घडे,गौरी महाजन ,तुषार पालखे यांनी केले.
तसेच या संपूर्ण युवा कवी संमेनाचे सूत्रसंचालन सौ.राजश्री वाणी मराठे तसेच मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी आपल्या निवेदनातून मनोरंजन केले.
आभार प्रदर्शन सौ. भारती महाडिक यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button