अमोल धडके यांना ‘आदर्श संपादक’ प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित.
पुरस्कार वितरण सोहळा

अमोल धडके यांना ‘आदर्श संपादक’ प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित.
विशेष प्रतिनिधी

रविवारी दि २५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नॅशनल लायब्ररी मुंबई बांद्रा पश्चिम येथे प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,वृत्तपत्र लेखक,सा.राष्ट्रहित सर्वोपरीचे मुख्य संपादक अमोल धडके यांचा पत्रकारिता या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘आदर्श संपादक’ प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.

मुंबई बांद्रा पश्चिम स्वामी विवेकानंद रोड नॅशनल लायब्ररी सभागृह येथे झालेल्या भव्यदिव्य राष्ट्रीय सोहळ्यात प्रमुख मान्यवर डॉ बाळासाहेब तोरस्कर ज्येष्ठ साहित्यिक मुंबई, डॉ.ख. र.माळवे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती, पद्मश्री डॉ.जी.डी.यादव अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकार,डॉ डेरिक एंजल्स नासा शास्त्रज्ञ,डॉ सुकृत खांडेकर संपादक दैनिक प्रहार,भानुदास केसरे मुख्याध्यापक बी पी ई हायस्कूल बांद्रा,प्रमोद महाडिक सचिव नॅशनल लायब्ररी,रामकृष्ण कोळवणकर चेअरमन,डायरेक्टर ग्रिंडलेज फार्मास्यूटिकल कंपनी,राजेश कांबळे वित्त व्यवस्थापक मल्टी नॅशनल कंपनी,डॉ नॅन्सी अल्बुकर्क संस्थापक अध्यक्ष वुमेन्स इंडीपेंडन्स फॉरएव्हर, या सर्व उपस्थित पाहूण्याच्या हस्ते अमोल धडके यांना सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी सहपरिवार मोहन धडके,संगीता धडके, रेश्मा अमोल धडके,उपस्थित होते.

संपादक अमोल धडके हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व पत्रकारिता या क्षेत्रात असून त्यांनी आपल्या साप्ताहिक ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुध्द आवाज उठवला आहे. यासोबतच सामाजिक क्षेत्रात समाजातील विविध प्रश्न अडी अडचणी सोडवण्याचा काम देखील अमोल धडके हे सातत्याने करत असतात. पत्रकारिता व सामाजिक कार्याची याचीच पोच पावती म्हणून
वृत्तपत्र लेखन पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य मुख्य संयोजक समितीने अमोल धडके यांना ‘आदर्श संपादक’ प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४, ने सन्मानित करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख संयोजक नागेश हुलावळे संस्थापक वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई, नॅशनल लायब्ररी बांद्रा, डी. पी. ई. सोसायटी, बांद्रा नाईट हायस्कूल, तसेच रमेश मारुती पाटील लेखक कोल्हापूर, प्रमोद सूर्यवंशी मुंबई, योगेश हरणे पुणे, व आयोजक समितीचे संपूर्ण टीम यांनी केले होते.
यापूर्वी देखील अमोल धडके यांना पत्रकारिता व सामाजिक झेत्रात ठसा उमटवल्या बदल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत..या पुरस्काराबद्धल अमोल धडके यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.