चिमुकली माहेरा सोहेल फरास यांनी आपल्या जीवनातील वयाच्या सहाव्या वर्षी पहिला रोजा पूर्ण केला.
रमजान महिना विशेष

चिमुकली माहेरा सोहेल फरास यांनी आपल्या जीवनातील वयाच्या सहाव्या वर्षी पहिला रोजा पूर्ण केला.
अक्कलकोट: प्रतिनिधी
अक्कलकोट शहरातील मौलाली गल्ली येथील सोहेल फरास यांची लेक ६ वर्षाच्या चिमुकल्या माहेरा सोहेल फरास यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला.
पवित्र रमजान महिना सुरू आहे, ज्यामध्ये मुस्लिम धर्मात महिनाभर रोजे (उपवास) केले जाते,
कुटुंबातील मोठ्या जणांना रोजा करताना पाहून लहान मुले ही उत्सुकतेने रोजा करण्याचा अट्टहास करतात,
असंच काही माझी चिमुकली माहेरा बाबतीत झालं, गेल्या चार दिवसांपासून त्याने निश्चय केला होता की रविवारी शाळेची सुट्टी असुन या दिवशी रोजा ठेवायचाच!
इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात. मोठ्यासह लहान मुले, मुलीही रमजानचे उपवास करतात.

प्रामुख्याने ७ वर्षांपेक्षा लहान मुले, मुली रोजाचा उपवास करीत नाहीत. परंतु माहेराने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी माहेराला आजी कडून नवीन कपडे व फुलाचा हार घालण्यात आले.
९ मार्च पहाटे ५:२२ ला घरच्यांबरोबर सहरी म्हणजेच दोनच घास मॅगी जेवण केली,
ठरल्याप्रमाणे त्याने आज दिवसभर अन्न पाणी त्याग करुन आणि सायकळी ६:३७ मिनटानी तब्बल १३ तासांनी उपवास सोडला व जीवनातील पहिला रोजा पुर्ण केला,
महेराने आपल्या जीवनाचा पहिला रोजा कमी वयात व चिकाटी पूर्ण केल्याबद्दल माहेराचा समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आजी आजोबा,आई वडील,काका, काकु आणि भाऊ आधी गल्लीतील सर्व मित्र परिवाराने शुभेच्छा दिली.
✍️सोहेल फरास अक्कलकोट
